Bhangaar

-20% Bhangaar

मी अशा समाजात जन्माला आलो होतो, की जिथल्या लोकांचं उकिरडा हेच जीवन होतं.
मी उकिरड्याशेजारीच जन्मलो, तिथंच वाढलो, त्यातलं उष्टं, शिळं, इतरांनी फेकलेलं अन्न
उचलून ते पोटात ढकलत, भंगार गोळा करून, ते विकून त्यावरच शाळेसाठी एक-एक पुस्तक-वही
गोळा करत शिकत गेलो. ते शिक्षण घेणं सोपं नव्हतंच. अंधश्रद्धा, रूढी-परंपरांशी, जातपंचायतीशी
लढा देत आज इथपर्यंत पोहोचलो. भंगार गोळा करून शिक्षण घेतलेला गोसावी समाजातला मी पहिला शिक्षक.

आपली कहाणी एखाद्या चित्रपटाला साजेशी आहे. बाबांना आपला अभिमान वाटतो तो,
समाजाने वाळीत टाकले असतानाही आपल्यातील ‘विद्यार्थी’ लुप्त न होता सदैव सजग राहिला, बहिष्काराची
तमा न बाळगता प्राप्त परिस्थितीवर जिद्दीने मात करत आपण आपले शिक्षण पूर्ण केलेत, याचा.
विशेष म्हणजे, शिक्षकी पेशा स्वीकारून शिक्षणाच्या प्रसारासाठी आपण जे प्रयत्न केलेत,
त्याची तुलनाच होऊ शकत नाही.
- डॉ. विकास आमटे

‘भंगार’ हे आत्मचरित्र गोसावी समाजाचं चित्र आपल्यापुढं ठेवतं. गोसावी समाजाचं भटकं जीवन,
तीन दगडांची चूल, तीन थामल्यांवर (काठ्यांवर) उभी पालं, भंगार गोळा करण्यातील मरण यातना,
कोंडाळ्याचे तीन भागीदार (माणूस, कुत्रं नि डुक्कर), जातपंचायतीचा बडेजाव, स्त्रीचं अस्तित्वहीन जगणं.
मुलांचं जन्मत: नि जन्मभर वंचित जगणं, हे सारं शब्दबद्ध करणारं ‘भंगार’ वाचकाला गोसावी समाजाचं
भंगारपण समजून घ्यायला भाग पाडतं.
डॉ. सुनीलकुमार लवटे

Bhangaar | Ashok Jadhav
भंगार | अशोक जाधव

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Ashok Jadhav

  • No of Pages: 188
  • Date of Publication: 31-10-2017
  • Edition: 5
  • ISBN: 978-93-86118-91-2
  • Availability: 100
  • Rs.250.00
  • Rs.200.00