English Grammar
इंग्रजी विषयाचं तेहत्तीस वर्ष अध्यापन केल्यानंतर आलेल्या अनुभवांचं संचित
म्हणजे Englirh Grammar In Marathi हे पुस्तक होय. इंग्रजी व्याकरण
शिकण्यासाठी मराठीतून केलेलं मार्गदर्शन असं वेगळं स्वरुप असलेल्या या
पुस्तकात कोणालाही सहजपणे इंग्रजी शिकता येईल अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण
गोष्टी दिलेल्या आहेत. त्यात... सर्व व्याकरणाची मांडणी ज्यावर आधारित आहे असे
अत्यंत उपयुक्त व पायाभूत व्याकरणविषयक सात तक्ते. मराठीकडून इंग्रजीकडे
जाताना साध्या, सोप्या आणि सरळ भाषेचा वापर. नियम, वाक्यरचना, स्पष्टीकरणे
व त्यांची सुटसुटीत सूत्रे यांसह 650 क्रियापदांची अर्था-नियमासहित चार रुपं.
परीक्षेतील प्रश्नांच्या स्वरुपाची व अपेक्षित उत्तरांची सविस्तर माहिती. तसेच
परिपूर्ण अभ्यासासाठीचं नियोजन व पूर्वतयारीचे टप्पे.
पायाभूत अभ्यासातून भाषेची आवड निर्माण करण्याचा व अर्थपूर्ण वाचन,
पाठांतर, नियमित सराव व स्वाध्यायातून आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न.
प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी व मनापासून इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या
सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकणारं हे पुस्तक प्रत्येक शाळा-महाविद्यालयांसह
घराघरात बाळगावं असं आहे.
English Grammar | Ramesh B. Fulari
इंग्लिश ग्रामर । रमेश बी. फुलारी