Jeevashma
Click Image for Gallery
जीवाश्म हा मानवासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे.
‘जीवाश्म’ म्हणजे साक्षात खडकात बंदिस्त झालेला जीव...
खरंतर करोडो वर्षांचा एक अख्खा कालखंड एखाद्या जीवाश्मात
बंदिस्त झालेला असतो. हे जीवाश्म आपल्याला आपल्या पूर्वज
असलेल्या सजीवांची आठवण करून देतात. त्याचबरोबर केवळ
आपला विचार न करता सृष्टीमध्ये आपल्यासोबत जगणाऱ्या इतर
जीवांचाही आपण आदर केला पाहिजे, याची आठवण करून देतात.
एकदा का आपण जीवाश्मांविषयी जाणून घेतलं की आपल्याला
आपल्या असण्याचा अर्थ कळेल.
दगडात देव असतो की नसतो हे मानण्यावर अवलंबून असतं,
पण दगडात जीव असतो आणि तो वेगवेगळ्या कालखंडांना
साधणारा दुवा असतो, हे विज्ञानानं सिद्ध केलं आहे. त्याची ही प्रत्येकाने
वाचावी अशी गोष्ट.
Jeevashma | Vidyadhar Borkar
जीवाश्म । विद्याधर बोरकर
