Tai_me_Collector_Vaunu
Click Image for Gallery
शून्यातून विशाल अवकाशाकडे झेपावणारा संघर्षमय प्रवास
"तोई, मी कलेक्टर व्हयनू" या आत्मकथनातून राजेश पाटील यांनी चित्रित केला आहे. राजेश पाटील या आत्मकथनाचा नायक असला तरी तो असंख्य अभावग्रस्त तरुणांच्या समूहाचा प्रतिनिधी म्हणून समोर येतो. सामान्य वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अंगभूत गुणवत्ता असते. त्या गुणवत्तेचा शोध घेऊन अथकपणे वाटचाल केली तर कर्तृत्वाची शिखरे साद घालतात, आव्हानांना सामोरे जाऊनच आपली मुद्रा उमटवता येते, हे वास्तव या आत्मकथनातून अधोरेखित झाले आहे. सामाजिक विषमता आणि आर्थिक विवंचनेमुळे हजारो तरुणांची सृजनशीलता नष्ट झाली. मात्र यावर मात करून अनेकांनी आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय आणून दिला आहे आणि त्यांच्या रूपाने समाजात चांगुलपणाची एक भावना निर्माण झालेली दिसते. सामान्यातूनच असामान्यत्वाचा जन्म होतो आणि तो भोवतालच्या समाजाला जगण्याची उर्मी प्रदान करतो
Tai me Collector Vaunu
ताई मी कलेक्टर व्हयनू