...Nahee Maniyale Bahumata Vivekwadi Chintan

-20% ...Nahee Maniyale Bahumata Vivekwadi Chintan

सुमारे तीस वर्षांच्या पटावर घडलेल्या लेखनापैकी हे काही निवडक लेख. वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी, वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या विषयांवर लिहिले गेलेले.
त्यामुळे त्यांतलं सूत्र शोधणं कठीण आहे; पण अशक्य मात्र नाही. कारण लिहिणारा माणूस एकच आहे. त्या माणसाची विज्ञान-विवेक यांच्यावर असलेली निष्ठा,
सगळ्या लोकांना सुखी-समाधानी आयुष्य मिळावं अशी आस, आणि मुख्य म्हणजे - माणसांवर नि जगण्यावर असलेलं निरतिशय प्रेम - सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभंग राहिलेलं दिसतं.
मराठी वाचकाला, आणि त्यातही ज्ञानाकरता भुकेल्या असलेल्या तरुण दोस्तांना विज्ञान, तत्त्वज्ञान, विवेकवाद या विषयांवरचं सकस साहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे हा ध्यास त्यामागे आहे.
हे एकदा लक्षात आलं, की तर्ककठोर भाव, नर्मविनोद, श्रद्धेसारख्या गोष्टींशी संवादण्याचा खुलेपणा, तत्त्वज्ञानातल्या कूटप्रश्नांबद्दलचं कुतूहल, वैचारिक शिस्त, विषयांचं
अफाट वैविध्य, भाषिक लवचीकपणा... अशा अनेक गुणांचं नवल वाटेनासं होतं.
चिंतनाचा पैस अवाढव्य आहे खरा पण केंद्रबिंदूपाशी मात्र तुम्हां-आम्हां सगळ्यांच्या जगण्याविषयीची आस्था आहे.

.... Nahi maniyale bahumata - Nanda khare
... नाही मानियले बहुमत - नंदा खरे

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.800.00
  • Rs.640.00